वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन 15 जानेवारी रोजी ओव्हल ऑफिसमधून देशवासियांना संबोधून निरोपपर भाषण देतील. राष्ट्राध्यक्षपद सोडण्यापूर्वीचे हे त्यांचे शेवटचे भाषण असेल. हे संबोध अमेरिकेच्या वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होणार आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी रात्री व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही महत्त्वाच्या मुद्यांवरही भाष्य केले. नोव्हेंबरच्या निवडणुकीत ट्रम्प यांना आपण हरवू शकलो असतो. परंतु पक्ष एकसंध ठेवण्यासाठी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तथापि, निवडणुकीच्या मध्यात उमेदवारी मागे घेतल्याबद्दल त्यांना कोणताही पश्चात्ताप नसल्याचेही त्यांनी सांगितले.









