आचरा प्रतिनिधी
मकर संक्रांतीचे औचित्य साधून मंगळवार १४ जानेवारी रोजी सकाळी ८ते ९ या कालावधीत इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे व ऋग्वेद गुरुकुल वायंगणी वेदमूर्ती श्री मुरवणे गुरुजी यांच्या संयुक्त विद्यमाने रामेश्वर मंदिर आचरा येथे सुर्य नमस्कार सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुर्योपासनेचे महत्व ग्रामोपाध्याय निलेश सरजोशी विषद करणार आहेत. तर प्रमुख मार्गदर्शन वेदमूर्ती मुरवणे गुरुजी यांचे लाभणार आहे. तरी स्त्री षुरुष आबालवृद्ध सर्वांनी सुर्य नमस्कार सेवेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे विश्वस्त मंडळाकडून करण्यात आले आहे.









