प्रतिनिधी
बांदा
शेर्ले येथील जागृत देवस्थान श्री देव रवळनाथ जत्रोत्सव सोमवार दिनांक 13 रोजी होत आहे. ही जत्रा लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. या जत्रोत्सवास सिंधुदुर्ग ,गोवा ,मुंबई येथून भाविक हजेरी लावतात. या निमित्ताने सकाळी पूजा अर्चा, तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाने सुरुवात होते. नारळ ठेवणे, ओटी भरणे, नवस बोलणे नवस फेडणे. रात्री उशिरा पालखी मिरवणूक लोटांगण कार्यक्रम संपन्न होतो. तसेच रात्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ (बाबी कलिंगण) नेरुर यांचा नाट्यप्रयोग होणार आहे तरी सर्व भाविकांनी या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन शेर्ले ग्रामस्थ, मानकरी व देवस्थान कमिटी यांनी केले आहे.
Previous Article33 रुपयांच्या दाखल्यासाठी मोजावे लागतात दीड ते दोन हजार
Next Article दहावी, बारावी परीक्षा-1 चे अंतिम वेळापत्रक जाहीर









