वृत्तसंस्था / बर्मिंगहॅम
येथे झालेल्या 17 वर्षांखालील महिलांच्या वयोगटाच्या ब्रिटीश कनिष्टांच्या खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारताची युवा स्क्वॅशपटू अनाहत सिंगने जेतेपद पटकाविले.
16 वर्षीय अनाहत सिंगने अंतिम सामन्यात इजिप्तच्या मलिका अल कॅरकेसीचा 4-11, 11-9, 6-11, 11-5, 11-3 अशा गेम्समध्ये पराभव केला. भारताची महिला स्क्वॅशपटू 16 वर्षीय अनाहत सिंगने यापूर्वी 11 आणि 15 वर्षांखालील वयोगटातील स्पर्धेत जेतेपद मिळविले आहे. मात्र तिला गेल्या वर्षी 17 वर्षाखालील वयोगटाच्या स्पर्धेत हार पत्करावी लागली होती. आशियाई क्रीडा स्पर्धेत तसेच आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत अनाहत सिंगने कांस्यपदके घेतली होती.









