न्यूयॉर्क
अमेरिकेचे आगामी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कॅनडाला अमेरिकेचा 51 वा प्रांत होण्याची ऑफर दिली आहे. ट्रम्प यांनी ही ऑफर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्याच्या काही तासांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे. अमेरिका आता कॅनडासोबतची व्यापारी तूट सहन करू शकत नाही. तसेच कॅनडाला अधिक अनुदान देऊ शकत नाही. कॅनडाला स्वत:चे अस्तित्व कायम राखण्यासठी याची अत्यंत अधिक गरज आहे. ट्रुडो यांना याची जाणीव असल्यानेच त्यांनी राजीनामा दिल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.









