बेळगाव : बेंगळूर येथे एका तीन महिन्यांच्या बाळाला एचएमपीव्ही या विषाणूची लागण झाल्यानंतर राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने काही मार्गदर्शक प्रणाली जाहीर केली आहे. राज्याने दिलेल्या प्रणालीनुसार नागरिकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी व काही गोष्टी टाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
- शिंक आली किंवा खोकला आला तर रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करा.
- सातत्याने साबण किंवा सॅनिटायझरने हात धुवून घ्या.
- गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा
- जर तुम्हाला ताप असेल, खोकला असेल किंवा शिंका येत असतील तर सार्वजनिक ठिकाणी जाऊ नका.
- शक्यतो हवेशीर ठिकाणी वावर करा.
- जर तुम्हाला कणकण असेल तर घरीच रहा व शक्यतो दुसऱ्यांच्या संपर्कात येऊ नका.
- सकस आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या.
या गोष्टी टाळा
- टिश्यू पेपर व रुमाल यांचा पुन्हा वापर करू नका
- आजारी माणसांच्या जवळ जाऊ नका. त्यांचे टॉवेल किंवा कपडे वापरू नका.
- डोळे, नाक आणि तोंड यांना सतत हात लावू नका.
- सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
- स्वनिर्णयाने औषध न घेता डॉक्टरांशी संपर्क करा.









