वृत्तसंस्था/ काठमांडू
गेल्या आठवडाभरात विमान अपघातासंबंधीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे दिसून येत आहे. नेपाळमधील अशाच घटनेची या घटनांमध्ये भर पडली आहे. बुद्ध एअरफ्लाईट कंपनीच्या एका विमानाचे या देशाची राजधानी काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी तातडीने अवतरण करण्यात आले. याप्रसंगी विमानात 76 प्रवासी होते. सर्व प्रवासी सुखरुप असल्याचे सांगण्यात आले. तसेच विमानाच्या डाव्या बाजूच्या इंजिनात अचानक आग लागल्याने विमानाचे त्वरित लँडिंग करण्यात आले. काही तांत्रिक समस्येमुळे हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मात्र, वैमानिकाने वेळीच लँडिंग करण्याचा निर्णय घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती देण्यात आली.









