अडीच कोटी रुपये खर्चातून रस्ताकाम करणार
बेळगाव : शहरातील विविध लोकवस्त्यांना संपर्क साधणाऱ्या बॉक्साईट रोडच्या विकासकामाला रविवार दि. 5 रोजी सुरुवात करण्यात आली आहे. महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भूमिपूजन करून रस्त्याकामाला सुरुवात केली. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सह्याद्रीनगराजवळील बॉक्साईट रोडवर रविवारी भूमिपूजन झाले. सुमारे 2.50 कोटी रुपये खर्चातून रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. या रस्त्यावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. त्याचबरोबर अवजड वाहनेही या रोडवरून धावत असतात. रस्त्यावर ठिकठिकाणी खाचखळगे पडले असून दुरुस्तीची मागणी अनेक दिवसापासून सुरू होती.
काम दर्जेदार करण्याच्या सूचना
मंत्री हेब्बाळकर यांनी कुदळ मारून रस्त्याकामाला सुरुवात करताना संबंधित कंत्राटदाराला सूचनाही केल्या. रस्त्याचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करावे, अशी सूचन केली. यावेळी विविध कॉलनीतील नेतेमंडळी तसेच टी. के. पाटील, बसवराज दुगण्णवर, मुश्ताक मुल्ला, संगीता तंगडी, वनिता गोंधळी यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.









