वृत्तसंस्था/सिडनी
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ चालु महिन्याच्या अखेरीस लंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला हा दौरा हुकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या दौरा कालावधीत कमिन्सची पत्नी दुसऱ्या आपत्त्याला जन्म देणार असल्याने तो या दौऱ्यावर जाण्याची शक्यता धुसर झाली आहे. या दौऱ्यात उभय संघात दोन कसोटी सामने खेळविले जातील. 29 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान हे सामने होणार आहेत. कमिन्सची पत्नी बिकाय याच कालावधीत प्रसुत होणार असल्याने कमिन्सने तिच्या समवेत राहण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवी आणि शेवटची कसोटी शुक्रवारपासून सुरू होणार असून या कसोटी संदर्भात कर्णधार कमिन्सने येथील एका इंग्रजी दैनिकाला वरील माहिती दिली आहे.









