वृत्तसंस्था/नवी दिल्ली
आपचे खासदार संजय सिंह यांनी भाजप नेते अमित मालवीय आणि भाजप खासदार मनोज तिवारी यांना मानहानीची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. भाजप नेत्यांनी संजय सिंह यांच्या पत्नी अनिता सिंह यांच्यावर मतदारयादीतील अनियमिततेचा आरोप केला होता. त्यांच्याविरोधात आप खासदाराने आता ही कारवाई केली आहे. राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपचे अमित मालवीय यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता. हे प्रकरण त्यांची पत्नी अनिता सिंह हिच्याशी संबंधित आहे. अमित मालवीय यांनी संजय सिंह यांच्या पत्नी अनिता सिंग यांच्यावर मते कमी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. गेल्या चार दिवसांपासून आम आदमी पार्टी आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक संघर्ष सुरू आहे.









