वृत्तसंस्था/ मेलबर्न
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी दरम्यान ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी भारतीय संघाला दुसऱ्यांदा भेटीचे आमंत्रण दिले. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानेज यांच्या शासकीय निवासस्थानी दोन्ही संघाची भेट झाली. एकीकडे ऑस्ट्रेलियन माध्यमांच्या रडारवर भारतीय संघ असताना दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भारतीय संघाचे आदरातिथ्य करत त्यांच्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. सोशल मीडियावर पंतप्रधान अल्बानेज यांनी भारतीय संघ व विराट कोहलीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी पंतप्रधानांनी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा व ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सशी ही संवाद साधला.









