कोल्हापूर :
खेलो इंडियाअंतर्गत लखनऊ येथे सुऊ असलेल्या अस्मिता हॉकी लीग-2024 ज्युनिअर वुमन्स फायनल फेज–टू कॉम्पिटीशनच्या अम्पायर मॅनेजरपदी कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय हॉकी पंच श्वेता पाटीलची निवड केली आहे. हॉकी इंडियाकडून तिची अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे. 6 जानेवारीपर्यंत (2025) सुऊ राहणाऱ्या या स्पर्धेच्या अम्पायर मॅनेजरपदाची धुरा सांभाळताना श्वेता ही 12 जणांची पंच प्रमुख म्हणून काम पाहत आहे.
अस्मिता हॉकी लीग फायनल फेज–टू या स्पर्धेच्या ऊपाने श्वेता ही गेल्या वर्षभरात सलग तिसऱ्या स्पर्धेत अम्पायर मॅनेजर म्हणून काम पाहत आहे. श्वेताला हॉकी महाराष्ट्रचे अध्यक्ष कृष्णप्रकाश, मनोज भोरे, हॉकी कोल्हापूरच्या अध्यक्ष सुरेखा पाटील, सचिव मोहन भांडवले, विजय साळोखे सरदार, हॉकी प्रशिक्षक सागर जाधव व क्रीडा शिक्षक महेश सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.








