सकाळी सातपासूनच चिकन, मटण दुकानांबाहेर ग्राहकांची गर्दी
बेळगाव : सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. या दरम्यान, थर्टीफर्स्टच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर हॉटेल्स, रेस्टॉरंट, रिसॉर्ट्स व माळरानावर मांसाहारी जेवणाचा बेत मोठ्या प्रमाणात आखण्यात आला होता. त्यामुळे सोमवार दि. 30 रोजी रात्रीपासूनच मांसाहारी दुकानात मोठी गर्दी झाली होती. मंगळवार दि. 31 रोजी सकाळी सातपासूनच चिकन, मटण दुकानांबाहेर ग्राहकांची गर्दी झाली होती. थर्टीफर्स्टच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. विविध ठिकाणी ओल्डमॅनच्या प्रतिकृतींचे दहन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. संगीताच्या तालावर तरुणाई थिरकण्यासह वेगवेगळ्या माध्यमातून सेलिब्रेशन करण्यात आले.
या दरम्यान विशेष करून मांसाहारी जेवणावर अधिक भर दिला जातो. चिकन, मटण, मासे आदी प्रकारच्या जेवणांना अधिक पसंती असते. त्यामुळे ही संधी कॅश करण्यासाठी अनेक हॉटेल्स व्यावसायिकांनी ग्राहकांसाठी ऑफर्सही ठेवल्या होत्या. त्यामुळे वर्षाअखेरचा दिवस सर्वांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी हॉटेल्स व्यावसायिकांनी सोमवारी रात्रीपासूनच मांसाहारी खरेदीवर भर दिला. मंगळवारी सातपासूनच शहर आणि उपनगरांतील मांसाहारी दुकाने गर्दीने फुलून गेली होती. चिकन 210 रुपये किलो तर मटण 750 रु. किलोप्रमाणे विक्री केले जात होते.









