रागाच्याभरात नवरदेवाच्या कारवर दुचाकी फेकली तर गाडीच्या काचाही दगडाने फोडल्या.
आजकाल एक्ससोबत फ्रेण्डझोन ठेवायचा आणि मुव्हऑन करायचं, असा ट्रेण्ड सुरु आहे. त्यामुळे पहिलं प्रेम, त्याचा विरह या भावना तरुणाईच्या पुस्तकांमध्ये दिसतही नाहीत. पार्श्वभूमीवर पुर्वाश्रमीच्या प्रेमात आकंठ बुडालेले प्रेमवीर हे फार दुर्मिळ चित्र झालेले आहे. अशातच एक अशी घटना घडली अन् हा व्हीडीओ चांगलाच व्हायरल झाला.
प्रेमात आणि युद्धात सगळकाही माफ असतं, अशात प्रेमी युगुल समाजात आपलं प्रेम सिद्ध करायला कोणाचीही पर्वा करत नाहीत. पण या व्हीडीओमध्ये काही वेगळचं घडलं आहे.
हा व्हिडीओ एका तरुणाचा आहे. त्याच्या एक्स- गर्लफ्रेण्डच्य लग्नाच्या वरातीत त्याने राडा केला आहे. हा तरुण एक्स गर्लफ्रेण्डच्या वरातीत शिरला आणि त्याने थेट नवरदेवाच्या गाडीवर अॅटॅक केला. नवरदेवाच्या चारचाकी गाडीवर या तरुणाने त्याची दुचाकी उचलून फेकली. तर त्या गाडीच्या काच फोडल्या.
मिडीया रिपोर्टनुसार हा व्हिडीओ हरियाणातील रोहतक या ठिकाणचा आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत २ कोटी १३ लाखांपेक्षा जास्त व्य्हुज मिळाले आहेत. या व्हिडीओबद्दल चर्चा मात्र जोरदार सुरू आहे. कोणी म्हणतयं की प्रियसीने फसवल्यामुळे हा तरुण वेडा झाला, तर कोणी म्हणतयं की हा स्किप्टेड व्हिडीओ आहे, हा तरूण चांगले कपडे घालून हे कृत्य करतोय म्हणजे हा व्हीडीओ स्क्रिप्टेड आहे. पण या व्हीडिओ थोड्याच वेळात व्हायरल झाल्याने सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.









