थिएटर चेंगराचेंगरीप्रकरणी अडचणीत वाढ
वृत्तसंस्था/ चेन्नई
एकीकडे दक्षिणचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा-2’ चित्रपट नवनवे रेकॉर्ड बनवत असतानाच दुसरीकडे न्यायालयीन फेऱ्यांचे संकट संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा मुलगा गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे. आता या प्रकरणात अल्लू अर्जुनच्या जामिनावरील निर्णय 3 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. अल्लू अर्जुनच्या जामीन याचिकेवर नामपल्ली न्यायालय 3 जानेवारीला निवाडा देणार आहे. चिक्कडपल्ली पोलिसांच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे न्यायमूर्ती या प्रकरणाचा निकाल सुनावणार आहेत. चिक्कडपल्ली पोलिसांनी नियमित जामीन विरुद्ध प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.









