वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्तम पुरुष टी-20 क्रिकेटपटू पुरस्कारासाठी भारताचा अर्शदीप सिंग, झिम्बाब्वेचा सिकंदर रझा, पाकिस्तानचा बाबर आझम व ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड यांचे नामांकन झाले आहे.
टी-20 प्रकारामध्ये अर्शदीप सिंगने भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून लौकीक मिळविला असून बुमराहला निवडक टी-20 सामन्यात खेळविले जात असल्याने अर्शदीप प्रमुख गोलंदाज बनला आहे. पदार्पण केल्यापासून त्याने आतापर्यंत त्याने या वर्षात 36 बळी मिळविले आहेत. 2022 मध्ये भुवनेश्वर कुमारे 37 बळी मिळविले होते. पण भुवनेश्वरने यासाठी 32 तर अर्शदीपने केवळ 18 सामन्यांत हे यश मिळविले आहे. 2022 मध्येही अर्शदीपने 33 बळी मिळवित तिसरे स्थान मिळविले होते. टी-20 वर्ल्ड कप अंतिम लढतीत त्याने संस्मरणीय कामगिरी केली होती. बुमराहमध्ये हा सामन्यात एका षटकात सामन्याला कलाटणी दिली होती.









