वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारतीय महिला फुटबॉल संघाचे प्रशिक्षक जोआकिम अलेक्झांडरसन यांनी मालदिवविरुद्ध होणाऱ्या मैत्रिपूर्ण लढतीसाठी 23 सदस्यीम महिला फुटबॉल संघाची घोषणा केली. 30 डिसेंबर व 2 जानेवारी रोजी या लढती होणार आहेत.
दोन्ही सामने येथील पदुकोन-द्रविड सेंटर ऑफ स्पोर्ट्स एक्सलन्स येथे दुपारी 3.30 वाजता खेळविले जातील. इंडियन फुटबॉलच्या यू ट्युब चॅनेलवर त्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. दोन्ही सामने येथील पदुकोन-द्रविड सेंटर ऑफ स्पोर्ट्स एक्सलन्स येथे दुपारी 3.30 वाजता खेळविले जातील. इंडियन फुटबॉलच्या यू ट्युब चॅनेलवर त्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. ‘बेंगळूरमध्ये होणाऱ्या शिबिरात काही वरिष्ठ महिला खेळाडूंही सहभागी होणार आहेत. त्यामुळे यू-20 व वरिष्ठ खेळाडूंचे मिश्रण या लढतींसाठी संघात असेल. आज सोमवारी होणाऱ्या सामन्यात आम्ही काही गोष्टींचा अवलंब करून पाहणार आहोत,’ असे प्रशिक्षक जोआकिम म्हणाले.
निवडलेला संघ पुढीलप्रमाणे : गोलरक्षिका-हेमप्रिया सेरम, मैबाम लिन्थोइनगम्बी देवी, नंदिनी. बचावपटू-अरुणा बाग, जुही सिंग, ज्युली किशन, संगीता बसफोरे, संजू, शिवानी टोपो, सोरोखैबम रंजना चानू, टी. थोइबिसाना चानू, विक्षित बारा. मध्यफळी-ग्रेस दांगमेई, काजोल डिसोजा, नेहा, एन. सिबानी देवी, नीतू लिंडा, रिम्पा हलदर. आघाडी फळी-ल्हिंगदेइकिम, लीम्डा कोम सेर्टो, पूजा, प्यारी झाझ, सिमरन गुरुंग. प्रशिक्षक-जोआकिम अलेक्झांडरसन, साहायक प्रशिक्षक-निवेता रामदास, गोलरक्षक प्रशिक्षक-दीपांकर चौधरी, हमीम केके.









