कोल्हापूर :
आठ महिन्यांपूर्वी शहरातील हुतात्मा पार्क येथील जयंती नाल्यात शिर नसलेला व सडलेला एका अज्ञात तऊणाचा मृतदेह पोलिसांना मिळाला होता. या खुनाच्या गुह्याचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी लावीत, मृत तऊण पिशवी (ता. शाहूवाडी) येथील अशोक बाबुराव पाटील (वय 48) हा असल्याचे उघडकीस आणले. या खूनप्रकरणी तिघा अल्पवयीन तऊणांसह अभिषेक मंजूनाथ माळी (वय 20), अतुल सुभाष शिंदे (वय 23, दोघे रा. डवरी वसाहत, यादवनगर, कोल्हापूर) यांना अटक केली.
या खून प्रकरणाचा मास्टर माईंड अजय ऊर्फ रावन शिंदे (वय 25 रा. डवरी वसाहत, यादवनगर, कोल्हापूर) हा असून, त्याचा एप्रिल 2024 मध्ये शहरातील रंकाळा चौपाटी येथे खून झाला आहे. हा खून दाऊ पिण्यासाठी बसल्यानंतर हटकल्याच्या क्षुल्लक कारणावऊन केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. याचा तपास जुना राजवाडा पोलीस करीत आहेत.
रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय उर्फ रावन शिंदे त्याचे दोन मेव्हणे अभिषेक माळी, अतुल शिंदे आणि तिघे अल्पवयीन तऊण असे सहा टोळके हुतात्मा पार्कमध्ये दारू पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी त्यांना अशोक पाटील यांनी हटकले. याचा राग मनात धरून या टोळक्याने अत्यंत शांत डोक्याने त्यांचे मुंडके एडक्याने कापून खून केला. त्यानंतर धड हुतात्मा पार्क येथील जयंती नाल्यात फेकून देऊन, मुंडके नाल्याच्या गाळात पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पण 4 एप्रिल, 2024 रोजी महानगरपालिकाकडून जेसीबीच्या सहाय्याने नाल्याची सफाई करताना धड मिळाले होते. या खून प्रकरणाचा तपास जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी समांतर सुरु केला होता.
तपासादरम्यान मिळालेला मृतदेह हा पिशवी (ता. शाहूवाडी) येथील अशोक पाटील याचा असून, तो शहरातील एका हॉटेलमध्ये काम करीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यावऊन पोलिसांनी मयत पाटील याची पत्नी व मुलगीचा डिएनए घेऊन तपासणीसाठी पाठवले. त्याचा अहवाल आल्यानंतर नाल्यात सापडलेला मृतदेह हा पाटील यांचाच असल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांचा खून कोणी आणि का केला? याचा तपास जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे, उपनिरीक्षक संतोष गळवे करीत होते. मात्र त्यांच्या हाती धागेदोरे लागत नव्हते.
दरम्यान, हा खून यादवनगरातील डवरी वसाहत येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार रावन शिंदे (याचा रंकाळा येथे नंतर खून झाला) व त्याच्या दोन मेहुण्यांनी करून, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना समजली. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, परशुराम गुजरे, वैभव पाटील, विशाल खराडे, गजानन गुरव, योगेश गोसावी, संतोष बरगे, प्रविण पाटील, महेश कोरवी, प्रदीप पाटील यांच्या पथकाला तपास करण्यास सांगितले. या पथकाने तिघा अल्पवयीन तऊणासह संशयित अभिषेक माळी व अतुल शिंदे या दोघांना अटक केली.
चौकशीमध्ये त्यांनी हुतात्मा पार्कमध्ये रात्रीच्या वेळी दारू पिण्यास बसल्यावर, आम्हाला येथे दारू का पिता असे विचारले असता, रागाच्या भरात त्याचा ऐडक्याने मुंडके तोडून खून केला. मुंडके लगतच्या जयंती नाल्याच्या गाळात पुरले. तर धड नाल्यात फेकल्याचे सांगितल्याने आठ महिन्यापूर्वी हुतात्मा पार्क येथील नाल्यात धड सापडलेल्या खुनाला छडा लागला.








