कोल्हापूर
तळागाळातील लोक आणि मतदारसंघातील सर्व पक्षांच्या पदाधिकारी व मतदारांनी आपल्याला दिलेल्या आमदारकीच्या माध्यमातून सहकारी साखर कारखाने, बँका आणि सहकारातील संस्थांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.
कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी बँकेच्यावतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात आमदार नरके बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष आणि गोकुळ दूध संघाचे संचालक अजित नरके होते. आमदार नरके यांनी स्वर्गीय डी.सी.नरके यांनी स्थापन केलेल्या कुंभी साखर कारखान्याच्या प्रगतीत उत्तरोत्तर वाढ व्हावी यासाठी आपण गेल्या वीस वर्षात प्रयत्न केल्याचे सांगितले. शिवसेना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करून आगामी जि.प.,पं.स.,जिल्हा बँक, गोकुळच्या निवडणुकीत सर्वांना बरोबर घेऊन जायचे असल्याचे ते म्हणाले. आमदारकीच्या माध्यमातून कारखान्याचे एक्सपान्शन आणि प्रगतीसाठी नक्की उपयोग करणार असल्याचे ते म्हणाले.
स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी डी.एस.राऊत यांनी तर प्रास्ताविक उपाध्यक्ष अरुण पाटील यांनी केले. संचालक प्रा.एस.पी.चौगले, के.डी.पाटील, श्रीकांत पाटील, आनंदराव माने यांची अभिनंदनपर भाषणे झाली.आमदार नरके यांचा उपाध्यक्ष अरुण पाटील व जेष्ठ संचालक बाबुराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आभार पंडित वरुटे यांनी मानले.
यावेळी संचालक हिंदुराव मगदूम, आनंदा पाटील, दत्तात्रय पाटील, रंगराव पाटील,विलास देसाई ,प्रदीप नाळे, रणजीत पाटील, मारुती चौगुले, दाजी पाटील, प्रकाश काटकर, सर्जेराव शिंदे,रघुनाथ वरुटे, दत्तात्रय कांबळे, ललिता बाटे, सदाशिव बाटे,दौलू पाटील, वसंत आळवेकर अकाउंट्स अधिकारी प्रवीण पोतदार, मीटिंग सेक्रेटरी दत्ता पाटील यांच्यासह सर्व शाखा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.आमदार नरके यांनी बँकेचे संस्थापक डी.सी.नरके यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
Previous Articleइचलकरंजीत 500 रुपयांच्या मुद्रांकाचा तुटवडा
Next Article बालवैज्ञानिकांच्या उपकरणांतून शाश्वत विकास








