आमदार रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन
कोल्हापूर
भारतीय जनता पक्षाचे आमदार रविंद्र चव्हाण आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. याप्रसंगी त्यांनी सहकुटुंब श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्यातील सर्व प्रलंबित कामे मार्गी लागवीत, अशी प्रार्थना श्री अंबाबाईच्या चरणी केली. भाजप पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, पक्ष जी काही जबाबदारी आमच्यावर सोपवेल, ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो. यानंतर देखील जी जबाबदारी देईल ती पार पाडेन.
ते आमदार म्हणून निवडून आल्यावर कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला आले होते. आमदार रविंद्र चव्हाण यांनी सहकुटुंब कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले.
महायुतीला मिळालेले घवघवीत यश सर्वांना माहिती आहे. जनतेच्या अखंड सेवेसाठी महायुतीचं सरकार उभं आहे. प्रलंबित काम महायुतीच्या सरकारच्या नेतृत्वाखाली योग्यप्रकारे मार्गस्थ करू. निवडणुकीच्या आधीही हेच गारणं देवीला घातलं होतं. येत्या पाच वर्षात जनतेचे सर्व प्रश्न योग्य पद्धतीने मार्गी लावू, असे प्रतिपादन आमदार रविंद्र चव्हाण यांनी केले.








