मुंबई
बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचा सिंकदर हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमा टीझर आज म्हणजे सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त (दि. २७) रोजी लॉन्च होणार होता. पण भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. यामुळे सलमान खान आणि टीमने मोठा निर्णय घेतला आहे. सिंकदर सिनेमाचा टीझर उद्या म्हणजे (दि.२८) रोजी सकाळी ११.७ मिनिटांनी लॉन्च होणार आहे.
आज २७ डिसेंबरला बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त सिकंदर सिनेमाचा पहिला टिझर प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. पण या घटनेनंतर हा टीझर रिलीज पुढे ढकण्यात आला असल्याचे हे नाडीयाडवाला ग्रॅण्डसन या एक्स वरील हॅण्डलवरून शेअर करण्यात आले.
Previous Articleकिमान 50 हजार मानधन द्या
Next Article दोन दुचाकींच्या धडकेत तरुण ठार ; दोघे जखमी








