वृत्तसंस्था / मेलबोर्न
रुमानियाची 33 वर्षीय हिला टेनिसपटू सिमोना हॅलेपने ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीतून माघार घेतली आहे. हॅलेपला गुडघा आणि खांदा दुखीच्या वेदना झाल्याने तिने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत हॅलेपला व्हाईल्ड कार्डद्वारे पात्र फेरीसाठी प्रवेश देण्यात आला होता. 2018 साली तिने ऑस्ट्रेलियन स्पर्धेत उपविजेतेपद तर वर्षअखेरीस तिने फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकली होती.









