कोल्हापूर :
कोल्हापूर–राधानगरी रस्त्यावरील खिंडी व्हरवडे गावानजीक भरधाव चारचाकी गाडीने सायकलस्वाराला पाठीमागून जोराची धडक दिल्याने, सायकलस्वार वृध्द जागीच ठार झाला. दत्तात्रय धोंडी पाटील (वय 67, रा. खिंडी व्हरवडे, रा. राधानगरी) असे त्यांचे नाव आहे. हा अपघात बुधवारी दुपारी घडला असून, यांची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली आहे. या अपघात प्रकरणी चारचाकी गाडी चालक माऊती राजाराम गोवेकर (वय 56, रा. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) याला रात्री उशिरा पोलिसांनी चारचाकी गाडीसह ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, माऊती गोवेकर बुधवारी सकाळी कणकवलीहून फोंडा मार्गे कोल्हापूराकडे एका नातेवाईकांच्या विवाह समारंभानिमित्याने सहकुटूंब चारचाकी गाडी मधून येत होते. त्यांच्या भरधाव चारचाकी गाडीची कोल्हापूर–राधानगरी रस्त्यावरील खिंडी व्हरवडे गावानजीक शेताकडे जनावरसाठी चारा आणण्यासाठी सायकलवऊन जात असलेल्या दत्तात्रय पाटील (रा. खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी) या वृध्दाच्या सायकलला पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी मोठी होती. या धडकेत दत्तात्रय पाटील सायकलवऊन उडून सुमारे 25 फुट रस्त्यावर पडल्याने, ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांना अपघात केलेल्या चारचाकी गाडीमधून उपचारासाठी भोगावती येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण या वृध्दाची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याना पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले, असता या वृध्दाचा उपचारापूर्वीच मृत्यु झाला. या घटनेची माहिती समजताच दत्तात्रय पाटील यांच्या नातेवाईकांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. त्यांचा मृतदेह पाहून केलेला आक्रोश उपस्थिताचे मन हेलावून टाकणारा होता. या अपघाताची माहिती समजताच राधानगरी पोलिसांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. या अपघात करणाऱ्या चारचाकी गाडीसह त्यांचा चालक माऊती गोवेकर (रा. कणकवली) याला ताब्यात घेतले.








