अर्ज भरायला सुरुवात
मुंबई
व्यावसायिक अभ्यासक्रमांनाच्या प्रवेश पूर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आत्तापासूनच सीईटीची तयारी करता यावी, यासाठी १९ अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व (सीईटी) चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे,
त्याबरोबर या परीक्षेच्या प्रत्यक्ष नोंदीलाही आजपासून सुरुवात केली आहे. एमबीए/ एमएमएस आणि एमपीएड या अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी प्रवेश अर्ज भरण्यास एक महिन्याची मुदत दिली आहे. या संदर्भातील वेळापत्रक जाहीर केले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ वर्षाकरिता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विद्यार्थ्यांना २५ जानेवारी पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. या तीन अभ्यासक्रमांचे वेळापत्रक सीईटीने जाहीर केले आहे.
यानंतर मार्च महिन्यात सुरु होणाऱ्या सीईटी परिक्षांचे वेळापत्रक टप्प्याटप्प्याने जाहीर होणार आहे. १६ मार्च ते २७ एप्रिय या ४५ दिवसांच्या कालावधीत या प्रवेश परिक्षा होणार आहेत. या संदर्भातील तयारी सुरु असून वेळापत्रक जाहीर केले जाईल, व उर्वरित परीक्षांसाठी नोंदणी सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.








