वार्ताहर/ केपे
पारोडा, केपे येथे बुधवारी सकाळीं झालेल्या दोन दुचाकींमधील अपघातात रोशन मुजावर याला मृत्यू आला. केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 8.45 च्या दरम्यान पारोडा येथे मडगावच्या बाजूने येणारी स्कूटर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या मोटारसायकलला धडकली. यात मोटारसायकलचालक रोशन मुजावर (वय 41, बोरीमळ-केपे) हा गंभीर जखमी झाला होता. त्याला नंतर उपचारांसाठी नेताना त्याचा मुत्यू झाला. या अपघातात स्कूटरचालक व मागे बसलेली व्यक्तीही जखमी झाली असून त्यांच्यावर मडगावातील इस्पितळात उपचार चालू आहेत. दरम्यान, बेशिस्तपणे दुचाकी चालवणे व इतर कलमांखाली केपे पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.









