बेळगाव :
शहापूर येथील तालुका कृषक समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेमध्ये बिनविरोध 15 सदस्यांची कार्यकारी समिती संचालक म्हणून निवड करण्यात आली. संस्थेचे संस्थापक विजयकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाच जणांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली. अध्यक्ष मोहन सी. अंगडी, उपाध्यक्ष सी. एस. सुरगीमठ, खजिनदार रमेश कळसन्नावर, सेक्रेटरी शंकर करवीनकोप आणि जिल्हा प्रतिनिधी शंकरगौडा पाटील. याशिवाय समाजाचे सदस्य म्हणून विजयकुमार पाटील, पायप्पा सिंगाडी, निंगव्वा रामापूर, सतीश चौगुले, कल्पना जालीहाळ, वर्धमान लेंगडे, सी. एस. सुरगीमठ, रवींद्र मेळद, यल्लाप्पा कोडचवाड, श्रीशैल कंबी यांची निवड करण्यात आली.









