प्रतिनिधी/ बेळगाव
लायन्स क्लब ऑफ बेळगावच्यावतीने गंगम्मा चिकुंबी मठाला वॉशिंग मशीन भेट देण्यात आली. सतीश बाळेकुंद्री व त्यांच्या कुटुंबीयांनी गंगम्मा चिकुंबी मठातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वॉशिंग मशीन दिली.
यावेळी शकुंतला बाळेकुंद्री, अध्यक्ष दया शहापूरकर, प्रभाकर शहापूरकर, कपिल तृप्ती, कीर्ती यांच्यासह इतर उपस्थित होते. बाळेकुंद्री कुटुंबीयांच्यावतीने विद्यार्थ्यांना चॉकलेट व फळांचे वाटप करण्यात आले.









