लोककल्प-नेत्रदर्शन हॉस्पिटलतर्फे आमटे गावात नेत्रशिबिर
प्रतिनिधी/ बेळगाव
लोककल्प फौंडेशन व नेत्रदर्शन सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील आमटे या गावी मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलच्या नेत्रदर्शन हॉस्पिटलतर्फे आमटे गावातील 65 नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली.
ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी लोककल्प फौंडेशनच्या माध्यमातून शिबिर आयोजित केले जात आहे. नेत्रदर्शनचे कार्तिक बडिगेर, डॉ. तुळशीकुमार, साहाय्यक व्यवस्थापक उदयकुमार व लोककल्प फौंडेशनचे अनिकेत पाटील, संदीप पाटील यासह इतरांच्या सहकार्यातून शिबिर यशस्वी झाले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.









