मालवण । प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन शाखा मालवण यांच्यावतीने जिल्हा परिषद शिक्षण विभाग तालुका मालवणचे गटशिक्षणाधिकारी मान . संजयजी माने यांच्याकडे चांगल्या प्रतीचे गोदरेजचे कपाट बनवून घेऊन सुपूर्त केले . सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा मुख्य दस्तऐवज हे त्याचे सेवा पुस्तक असते . त्या सेवा पुस्तकाच्या आधारे या सेवानिवृत्त शिक्षकांचे पुढील लाभ काढले जातात . काही वेळा सेवापुस्तक फाटणे , जीर्ण होणे आणि न सापडणे अशा अनेक समस्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांना सेवानिवृत्तीच्या लाभांपासून वंचित राहावे लागते . यासाठी या सर्व सेवानिवृत्त शिक्षकांची सर्व सेवापुस्तके एकाच ठिकाणी व एकाच कपाटात सुरक्षित रहावीत या उद्देशाने चांगल्या प्रतीचं कपाट बनवून घेऊन त्यांना देण्यात आले .या कपाटामध्ये सेवानिवृत्त सर्व प्राथमिक शिक्षकांची सेवा पुस्तके सुरक्षित ठेवावी अशी अपेक्षा आणि विनंती मान . संजय माने साहेब यांना करण्यात आली . त्यांनीही सर्व सेवानिवृत्त शिक्षकांची सर्व सेवा पुस्तके एकाच कपाटामध्ये सुरक्षितपणे ठेवू असे आश्वासन दिले .यावेळी विस्तार अधिकारी दिक्षित साहेब , तालुका अध्यक्ष विजय चौकेकर , उपाध्यक्ष ज्ञानदेव ढोलम ‘ सचिव आनंद धुत्रे . सदस्या मिलन सारंग ‘ रंगराव वडर . श्रृती गोगटे ‘ दर्शना प्रभू , केंद्रप्रमुख नंदकिशोर गोसावी ‘ शिवराज सावंत आदी उपस्थित होते .









