वृत्तसंस्था / .नवी दिल्ली
दिल्लीत वायू प्रदूषणाची स्थिती सुधारल्याने कठोर निर्बंध असणारे नियम आता शिथील करण्यात यावेत असा आदेश दिल्ली हवामान प्राधिकारणाने काढला आहे. त्यामुळे ग्रेडेड सिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (जीआरएपी) ची पातळी सध्याच्या चार वरुन कमी करण्यात आली आहे. मंगळवारी संध्याकाळी चार वाजता दिल्लीच्या वायू प्रदूषण निर्देशांक 369 इतका होता. भारतीय हवामान विभाग आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजी या दोन्ही महत्वाच्या संस्थानी, आगामी काळात दिल्लीतील वायू प्रदूषण आणखी कमी होईल, असे भाकित केले आहे.
जीआरएपी-4 या पातळीचे नियम अत्यंत कठोर असतात. ही पातळी लागू होती, तेव्हा दिल्लीतील सर्व बांधकामे थांबविण्यात आली होती. तसेच केवळ जीवनावश्यक वस्तू वाहतूक वगळता दिल्लीत अन्य कोणत्याही प्रकारची मालवाहू वाहने येण्यावर पूर्ण प्रतिबंध लागू करण्यात आला होता. 10 आणि 12 चा अपवाद वगळता शाळांचे इतर वर्गही बंद ठेवण्यात आले होते. आता हे निर्बंध टप्प्याटप्प्याने हटविण्यात येत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.









