नवी दिल्ली :
टाटा समूहाच्या नेतृत्वातील कंपनी टाटा इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन यांचे समभाग मंगळवारी मोठ्या तेजीत कामगिरी करताना दिसले. समभाग जवळपास 8 टक्के तेजीत होते. टाटा समूहातील सहकारी कंपनी टाटा कॅपिटल यांनी आपला आयपीओ आणण्याची घोषणा केली आहे. टाटा कॅपिटल या योगे 15 हजार कोटी रुपये उभारण्याची योजना बनवत आहे.
टाटा समूहाने अलीकडेच कोटक इन्वेस्टमेंट बँकिंगच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली असून आयपीओ सादरीकरणाला हिरवा कंदील दाखवला आहे. यानंतर प्रक्रियेलाही सुरुवात केल्याचे समजते. टाटा सन्स आणि टाटा कॅपिटल बिगर बँकिंग वित्त कंपनी म्हणून कार्यरत आहे. सप्टेंबर 2025 मध्ये कंपनीचे समभाग बाजारात सुचीबद्ध करण्याच्या दिशेने प्रयत्न केले जाणार आहेत. टाटा कॅपिटलमध्ये टाटा सन्सची जवळपास 93 टक्के हिस्सेदारी आहे.









