खासदार नारायण राणे यांचे स्पष्टीकरण
रत्नागिरी
रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकणातील तरुण-तरुणींना रोजगार मिळवून देण्यासाठी बारसू रिफायनरी प्रकल्प अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांमार्फत इच्छुक कंपन्यांशी आपण स्वतः बोलणार आहोत. कंपन्या तयार असतील तर विरोधाची पर्वा न करता बारसू रिफायनरी १०० टक्के कार्यान्वित करणार, असा विश्वास खासदार नारायण राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीनंतर खासदार नारायण राणे यांनी आपल्या संपर्क कार्यालयात सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या बैठकीची माहिती दिली. खासदार झाल्यानंतर आपण पहिल्यांदान जिल्ह्यातील प्रमुख कामांचा आढावा घेतल्याचे त्यांनी म्हटले. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई-गोवा महामार्ग, मिऱ्या-नागपूर महामार्ग यांच्या कामाची स्थिती आपण जाणून घेतली. मुंबई-गोवा महामार्गाची एक मार्गिका एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याची सूचना आपण केल्याचे राणे यांनी सांगितले.
Previous Articleनिवडणुकीचे पडघम वाजणार, इच्छुकांमध्ये घालमेल
Next Article केक तपासणीकडे ‘अन्न व औषध’चे दुर्लक्ष








