आजी-माजी सैनिक-महिला परिवारातर्फे आयोजन
बेळगाव : आजी-माजी सैनिक आणि महिला परिवारातर्फे ‘5 वी रॉयल मराठा बटालियन’चा 225 वा स्थापना दिन बेळगाव-वेंगुर्ला येथील कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. 22 डिसेंबरला मराठा बटालियनला 225 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून 1971 च्या युद्धातील निवृत्त कर्नल एच. डब्ल्यू, मार्टिन उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन झाले. यावेळी वीरमाता, वीरपत्नी, वीरनारींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी बेळगाव, चंदगड, आजरा, गडहिंग्लज, सावंतवाडी, सिंधुदुर्ग, खानापूर, चिकोडी, निपाणी, कागल, कारवार परिसरातील आजी-माजी सैनिक व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. यावेळी शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.









