साहित्यिक, सामाजिक, पत्रकारिता, शिक्षण, क्रीडा पुरस्कार : येत्या 5 जानेवारी रोजी 20 व्या मराठी साहित्य संमेलनात होणार वितरण
वार्ताहर /येळ्ळूर
येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्यिक, सामाजिक, पत्रकारिता, शिक्षण, क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या साहित्य संमेलनात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. राष्ट्रवीरकार शामराव देसाई साहित्यिक पुरस्कार पुणे येथील दत्ता देसाई यांना देण्यात येणार असून प्राचार्य अनंतराव देसाई यांच्यामार्फत हा पुरस्कार देण्यात येतो. दिवंगत मारुती पाटील (पेंटर) सामाजिक पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र येळ्ळूरचे डॉ. रमेश दंडगी यांना जाहीर झाला असून परशराम पाटील (येळ्ळूर) यांच्यामार्फत हा पुरस्कार दिला जातो. रमाबाई आंबेडकर महिला सामाजिक पुरस्काराच्या मानकरी भारतनगर येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुरेखा पोटे या आहेत. दलित संघटनेचे नेते मल्लेश चौगुले (बेळगाव) यांच्यामार्फत हा पुरस्कार देण्यात येतो. कृष्णा मुचंडी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार शिवाजी शिंदे यांना देण्यात येणार असून पत्रकार सुहास हुद्दार यांच्यामार्फत हा पुरस्कार देण्यात येतो.
कै. गावडोजी पाटील गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार श्री शिवाजी विद्यालय येळ्ळूर येथील संजय मजुकर यांना जाहीर झाला असून विश्व भारत सेवा समितीचे संस्थापक परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांच्यामार्फत हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारांचे स्वरुप शाल, श्रीफळ, मानचिन्ह व रोख रु. 5000 असे आहे. आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराचे मानकरी मराठी विद्या निकेतनचे क्रीडा शिक्षक महेश हगिदळे ठरले आहेत. शाल, श्रीफळ, मानचिन्ह व रोख रु. 3000 असे याचे स्वरुप आहे. कै. गंगुबाई गुरव विशेष साहित्य पुरस्काराचे मानकरी हलकर्णी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार ठरले आहेत. मराठी साहित्यातील कथा, कादंबरी, नाटक, कविता आदींमध्ये ग्रामीण स्त्राrचे उठावदार चित्रण केलेल्या साहित्याला आप्पासाहेब गुरव यांच्या आजी कै. गंगुबाई गुरव यांच्या नावे देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप शाल, श्रीफळ, मानचिन्ह व रोख रु. 7000 असे आहे. या शिवाय डी. जी. पाटील (येळ्ळूर) यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचा विशेष सन्मान करण्यात येत असून यल्लाप्पा टक्केकर यांना कृषी पुरस्कार, कु. राजवीर यल्लाप्पा बिर्जे (कराटेपटू), किसन विजय टक्केकर (सायकलपटू), अनंत बाळकृष्ण धामणेकर (सायकलपटू) यांचाही सत्कार होणार असल्याचे साहित्य संमेलनाच्या कमिटीकडून सांगण्यात आले.









