महापालिकेकडून दहा लाखाचा निधी मंजूर
बेळगाव : केळकरबाग येथील रस्ता पूर्णत: खराब झाला होता. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी वारंवार होत होती. पावसाळ्याच्या दिवसात तर हा रस्ता खड्ड्यांनी भरला होता. याची दखल घेत अखेर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. दहा लाख रुपये निधी खर्च करून केळकरबाग कॉर्नर ते रामदेव गल्ली कॉर्नरपर्यंतचा रस्ता केला जाणार आहे. केळकरबाग येथील रस्ता ठिकठिकाणी खोदाईमुळे खराब झाला होता. रस्ता अरुंद असून या ठिकाणी आस्थापनांची संख्या अधिक असल्यामुळे रस्ता लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी करण्यात येत होती. याची दखल घेत महापालिकेच्या निधीमधून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. नगरसेवक शंकर पाटील यांच्या प्रयत्नातून दहा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सध्या रस्त्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. या परिसरात अनेक कार्यालये तसेच दुकाने असल्याने रस्ता लवकर करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.









