एंडोमेट्रियोसिस आजाराने ग्रस्त
जगभरात असे अनेक आजार आहेत, जे उपचाररहित अताहेत. यातील काही आजारात एखाद्या मुलाची त्वचा माशाप्रमाणे होते, तर काही जण बालपणीच वृद्धासारखे दिसू लागतात. अनेक आजारांमध्ये अचूक आजार होऊ शकत नाहीत. अशा स्थितीत लोक अत्यंत मोठ्या प्रमाणात वेदनेला सामोरे जातात किंवा मृत्यूमुखी पडतात. इंग्लंडच्या मँचेस्टर येथे राहणाऱ्या महिलेला अशाचप्रकारचा भयानक आजार आहे. या 27 वर्षीय महिलेचे नाव रोया रसौली असून ती एक उद्योजिका आहे.
वयाच्या 14 व्या वर्षापासून रोयाला प्रचंड प्रमाणात पोटदुखी व्हायची, यामुळे ती तडफडत असायची. तरीही ती कशाप्रकारे स्वत:च्या वेदना सहन करत होती. अनेक डॉक्टरांना दाखविले, तरीही दिलासा मिळाला नाही. परंतु अलिकडेच तिन स्वत:च्या आजाराबद्दल सांगितल्यावर लोकांना धक्का बसला आहे. रोया ही एंडोमेट्रियोसिस नावाच्या उपचाररहित आजाराने ग्रस्त आहे. प्राइड ऑफ ब्रिटन पुरस्कार जिंकणाऱ्या रोया रसौलीने स्वत:चा आजार आणि त्यामुळे होणाऱ्या समस्यांचा खुलासा केला आहे. जेव्हा मला एंडोमेट्रियोसिसबद्दल कळले, तेव्हा मी हादरून गेले. या जुन्या आजारामुळे मी मागील 14 वर्षांपासून वेदना सहन करत आहेत. या तीव्र वेदनेपासून दिलासा मिळवून देऊ शकेल अशा डॉक्टरचा शोध घेत आहे. अनेक डॉक्टरांना दाखविल्यावरही विशेष दिलासा मिळालेला नसल्याचे ती सांगते.
एंडोमेट्रियोसिस जगभरात लाखो महिलांना प्रभावित करतो, हा एक उपचाररहित आजार असून यात गर्भाशयाच्या बाहेर फैलोपियन ट्यूबच्या क्षैत्रात पेशी वाढत असतात. हे भयानक वेदनेचे कारण ठरते, जे कुठल्याही दैनंदिन हालचालींना प्रभावित करू शकते. या आजारावर कुठलाही उपचार नाही, तरीही याच्या लक्षणांवर उपचार औषधे आणि काही प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेद्वारे केला जाऊ शकतो असे तिने सांगितले आहे.
या आजाराने ग्रस्त महिलांना मासिक पाळीदरम्यान तीव्र वेदना आणि अधिक प्रमाणात रक्तस्राव होतो. अनेक शारीरिक समस्या देखील होतात. अशा स्थितीत या आजाराने ग्रस्त महिलांच्या समस्या पाहता युवा फॅशन डिझाइनर रोयाने मँचेस्टर मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीत शिकविण्यात आलेल्या कौशल्याचा वापर करत एक फॅशन ब्रँड ‘फेमवियर’ लाँच केला असून याचा उद्देश एंडोमेट्रियोसिस यासारख्या आजाराने पीडित महिलांसाठी स्टायलिश अणि आरामदायी कपडे तयार करणे आहे. याचमुळे बँडला मोठी लोकप्रियता प्राप्त झाली. वाढत्या लोकप्रियतेदरम्यान रोयाला प्राइड ऑफ ब्रिटन अवॉर्डसमध्ये ‘द किंग ट्रस्ट यंग अचीव्हर अवॉर्ड’साठी नामांकित करण्यात आले. माझ्या कामाला अशाप्रकारे मान्यता मिळणे अत्यंत भावनात्मक आहे. फेमवियर तयार करणे सोपे नव्हते. परंतु मी स्वत:च्या व्हिजनवर ठाम राहिले. एंडोमेट्रियोसिस सारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या सर्व महिलांना हे समर्पित आहे. हा आजार झेलणाऱ्या महिला दररोज संघर्ष करतात, अशा महिलांना मदत करणे शक्य झाल्याने मी स्वत:ला सुदैवी मानते असे रोयाने म्हटले आहे.









