प्रतिनिधी/ बेळगाव
खानापूर येथील शरण ढोर कक्कय्या स्वामीमठ, अखिल भारतीय ढोर कक्कय्या समाज मंडळाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी विठ्ठल पोळ, उपाध्यक्ष प्रकाश सोनावणे व विनायक घोडके, सचिव लक्ष्मीकांत घोडके, खजिनदार पूर्णाजी खराटे, संचालक केशव इंगळे, सिद्धराम स्वामी नारायणकर, प्रमोद हुटगीकर, गीता खंदारे यांची निवड करण्यात आली. ढोर कक्कय्या समाजाच्या विकासासाठी कार्यरत राहू असे आश्वासन नूतन पदाधिकाऱ्यांनी दिले.









