वृत्तसंस्था/ मेलबर्न
बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटीच्या आधी भारतीय गोलंदाजांनी शनिवारी मेलबर्नमध्ये जाळ्यात जोरदार सराव केला. येत्या गुऊवारपासून प्रतिष्ठेच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर ही कसोटी खेळविली जाणार असून सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत असल्याने या कसोटीचे महत्त्व वाढले आहे. जोश हेझलवूड दुखापतीमुळे संघातून बाहेर पडल्यामुळे सीन अॅबॉट या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या संघातून खेळण्याची शक्यता आहे.
अधिकृत ‘एक्स हँडल’वर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मेलबर्नमधील सराव सत्रात भारतीय गोलंदाज घाम गाळत असल्याची क्लिप शेअर केली आहे. त्यात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, आकाश दीप, नितीशकुमार रे•ाr, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश राहून ते मालिकेतील महत्त्वपूर्ण कसोटी सामन्यापूर्वी सर्वोत्कृष्ट सुरात दिसलेले आहेत.
‘कठोर परिश्रमाला पर्याय नाही. पडद्यामागील अथक परिश्रमांचे ऊपांतर पुढे मैदानावरील यशात होते. आम्ही बॉक्सिंग डे कसोटीसाठी सज्ज झालो असून भारतीय गोलंदाज कसलीच कसर राहणार नाही याची काळजी घेत आहेत, असे बीसीसीआयने व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे.
त्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना जडेजा म्हणाला की, भारतीय फलंदाजीच्या वरच्या फळीने धावा करणे आवश्यक आहे. ‘वरच्या फळीने धावा केल्या पाहिजेत. जर त्यांनी धावा काढल्या नाहीत, तर नक्कीच मधल्या आणि खालच्या फळीतील फलंदाजांवर दबाव येतो, जबाबदारीही वाढते. एक संघ म्हणून आम्हाला चांगली कामगिरी करण्यासाठी वरच्या फळीची गरज असते. जर प्रत्येकाने योगदान दिले, तर संपूर्ण संघाची कामगिरी चांगली होईल, असे जडेजाने मेलबर्नमध्ये पत्रकारांना सांगितले.









