वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनने 2025 साली होणाऱ्या आयएसएसएफच्या कनिष्ठांच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेचे यजमानपद भारताला देण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी ही माहिती अखिल भारतीय रायफल संघटनेच्या प्रवक्त्याने दिली आहे.
अलिकडच्या कालावधीत भारताने दोन अव्वल आंतरराष्ट्रीय विश्व नेमबाजी स्पर्धांचे यजमानपद यशस्वीपणे भूषविले आहे. 2023 साली भोपाळमध्ये वरिष्ठांची विश्वचषक नेमबाजी स्पर्धा तर त्यानंतर चालु वर्षांच्या प्रारंभी विश्वचषक फायनल्स नेमबाजी स्पर्धा भारतात झाली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या कनिष्ठांच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले.









