सणाची तयारी ख्रिसमसला काही आठवडे आधीपासूनच तयारी सुरु होते. घरे आणि चर्च सजवली जातात, क्रिसमस ट्री सजवला जातो, आणि घराघरात 'क्रिसमस लाइट्स' लावल्या जातात.

ख्रिसमस  डिनर : ख्रिसमसच्या दिवशी एक मोठं आणि समृद्ध जेवण तयार केलं जातं. मांसाहारी पदार्थ, केक, मिठाई आणि विविध प्रकारचे पदार्थ तयार करतात.

ख्रिसमसच्या गाण्यांचे महत्त्व ख्रिसमसच्या काळात ख्रिसमस कारोल्स गाणं खूप लोकप्रिय आहे. "जॉय टू द वर्ल्ड", "साइलंट नाइट", "हॅपी ख्रिसमस" हे गाणी प्रत्येकाच्या ओठावर असतात

सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व या सणाचा उद्देश एकता, प्रेम आणि सहकार्याचा संदेश देणे आहे. अनेक लोक या दिवशी गरिबांना मदत करण्याचा संकल्प करतात,

नवीन आशा- प्रेमाचा संदेश या दिवशी लोक एकमेकांना गिफ्ट्स देऊन प्रेम व्यक्त करतात. हे प्रेम, आनंद आणि एकता वाढवण्याचा मार्ग ठरतो.