सावंतवाडी प्रतिनिधी
राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली आहे. या सत्तेमध्ये कॅबिनेट मंत्रीपदी महायुतीचे आमदार नितेश राणे यांची निवड झाली आहे. तसेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विजयी चौकार मारत बहुमताने विजयी झालेले आमदार दीपक केसरकर व आमदार निलेश राणे या तीनही नेत्यांचा भव्य नागरी सत्कार सावंतवाडी तालुका महायुतीच्या वतीने येत्या 25 डिसेंबरला मोती तलावाच्या काठी शिवउद्यान जवळ आयोजित करण्यात आला आहे. या सत्कार सोहळ्याच्या दृष्टीने महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी ,कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या नागरी सत्कार सोहळ्याची तयारी करण्यात येत आहे..या सत्कार सोहळ्याला महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.









