सुदैवाने प्राणहानी टळली, वाहनांचे मोठे नुकसान
बेळगाव : कणबर्गी रोडवर भरधाव टिप्परने कारला ठोकरल्याने दुभाजकावर कार उलटली. सुदैवाने या अपघातात कोणतीच प्राणहानी झाली नाही. मात्र, कारसह दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी सकाळी पेट्रोलपंपजवळ ही घटना घडली. यासंबंधी रात्री वाहतूक उत्तर विभाग पोलिसांशी संपर्क साधला असता अपघात घडला आहे. मात्र, या अपघातात कोणतीच प्राणहानी झाली नाही, असे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत यासंबंधी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.









