कर्नाटक राज्य रैतोदय हसिरु सेनेची आंदोलनाद्वारे मागणी
बेळगाव : सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांनी सरकारी शाळेतच प्रवेश घ्यावा, जमिनींचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना ओळखपत्र द्यावी, शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून द्या, कायमस्वरुपी सिंचनसाठी सुविधा उपलब्ध करून द्या आदी मागण्यांसाठी कर्नाटक राज्य रैतोदय हसिरु सेनेतर्फे गुरुवारी विधानसौध परिसरात आंदोलन छेडण्यात आले. जमिनीतील व्यवहाराचा घोळ थांबविण्यासाठी जमिनीचे सर्वेक्षण करून संबंधित शेतकऱ्यांना ओळखपत्र द्यावीत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी सुरक्षीत राहतील. शेतकऱ्यांना जाचक ठरणारे कायदे मागे घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे. शेती जमीन कायमस्वरुपी ओलिताखाली आणण्यासाठी सिंचन व्यवस्थेचा वापर करावा यासाठी शासनाकडून अनुदान आणि सुविधा पुरवाव्यात, प्रत्येक तालुक्यात तीन पिके घेण्यासाठी सिंचन पद्धत महत्त्वाची आहे. यासाठी शासनाने पुढाकार घेऊन सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.









