अपह्रत मुलीची सुटका
संशयित तरूणाला अटक
कोल्हापूर
अल्पवयीन मुलीचे अपहरण करू तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित तरुणाला अटक केली. चेतन शिवाजी तिरसे ( वय २४, रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) असे त्याचे नाव असून त्याच्या विरोधात अपहरण, पोस्को अंतर्गत लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी पीडित मुलीची सुटाक केली.
संशयीत चेतन तिरसे याने मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी लक्ष्मीपूरी पोलिसात तक्रार दाखल केली. याची दखल घेवून पोलिसांनी संशयित तिरसेसह मुलीचा शोध सुरू केला. तो गेल्या तीन दिवसांपासून मुलीसह पसार होता. शुक्रवारी दुपारी पोलिसांनी संशयीत तिरसेला रंगेहाथ पकडले. त्याच्या ताब्यातून मुलीची सुटका केली.
पोलिसांनी मुलीसह संशयित आरोपी तिरसे याच्याकडे कसून चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान तिरसेने अपह्त मुलीवर अपहरणादरम्यान लैंगिक अत्याचार केल्याची कुबली दिली. पोलिसांनी अपहरण करण्यामध्ये वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.
Previous Articleशेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध करा
Next Article बेकायदेशीर शिक्षक भरतीबाबत कारवाई करा








