वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचा यष्टीरक्षक आणि फलंदाज संजू सॅमसनला आगामी होणाऱ्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी केरळ संघाने डच्चू दिला आहे. या स्पर्धेसाठी आयोजित केलेल्या सराव शिबिरामध्ये संजू सॅमसन दाखल न झाल्याने त्याला वगळण्यात आले आहे.
2024-25 च्या सय्यद मुस्ताकअली करंडक क्रिकेट स्पर्धेत संजू सॅमसनने केरळ संघाचे नेतृत्व केले होते. या स्पर्धेत केरळची बाद फेरीसाठीची संधी थोडक्यात हुकली होती. आता या आगामी स्पर्धेसाठी केरळ संघाच्या कर्णधारपदी सलमान निझारची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याच प्रमाणे कर्नाटक संघातील अनुभवी फलंदाज मनीष पांडे विजय हजारे कंरडक क्रिकेट स्पर्धेसाठी उपलब्धराहू शकणार नसल्याने आता कर्नाटकाचे नेतृत्व मयांक अगरवालकडे सोपविण्यात आले असून श्रेयस गोपाल उपकर्णधार म्हणून राहिल.
केरळ: सलमान निझार (कर्णधार), रोहन कुनुमल, एस. रॉजर, मोहम्मद अझरुद्दीन, आनंद कृष्णन, कृष्णा प्रसाद, जे. सक्सेना, आदित्य सरवटे, एस. जोसेफ, बी.थंपी, एन. पी. बेसील, निदेश, इडेन टॉम, शरफुद्दीन, अकिल स्केरीया, व्ही. सुरेश,व्ही. चंद्रन, एम. अजनास
कर्नाटक : मयांक अगरवाल (कर्णधार), श्रेयस गोपाल, निकिन जोस, अनिष सिमरन, श्रीजीत, अभिनव मनोहर, हार्दीक राज, विशाख विजयकुमार, वासुकी कौशिक, विद्याधर पाटील, किसन बेदरे, अभिलाश शेट्टी, मनोज भांडगे, प्रवीण दुबे आणि सिसोदीया.









