कसबा बीड :
सावर्डे दुमाला (ता. करवीर ) येथील ग्रामपंचायतीच्या नूतन उपसरपंच पदी हिंदुराव भाऊसो भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच भगवान रोटे होते. निवडीनंतर मान्यवरांच्या हस्ते भोसले यांचा सत्कार करण्यात आला. स्व.आम.पी.एन.पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. हलगीच्या निनादात गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली. ग्रामदैवत व गावातील देवतांना पुष्पहार अर्पूण आशीर्वाद घेतले.
यावेळी माजी सभापती पांडुरंग पाटील, माजी सरपंच भगवान पाडळकर, तंटामुक्त अध्यक्ष बळवंत कारंडे, बाजीराव कारंडे, निवृत्ती कारंडे, दामाजी रोटे, तुकाराम पाटील, पंढरीनाथ निकम, सागर मोहिते, हंबीरराव कारंडे, सर्जेराव भोसले, सागर सुर्वे, पांडुरंग भोसले, ग्रामसेवक शिवाजी वाडकर आदीसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.








