वार्ताहर/येळ्ळूर
श्री चांगळेश्वरी स्पोर्ट्स क्लब येळ्ळूर आयोजित श्रीराम सेना हिंदुस्थान चषक फुल्ल पिच क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर यांनी केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते यल्लुप्पा पाटील, निवृत्त सैनिक विजय धामणेकर, एकनाथ पोटे, ग्राम पंचायत सदस्य राकेश पाटील, उत्तम मंगनाकर, परशराम कणबरकर, उमेश गोरल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. आजचा तरुण मैदानी खेळापासून दुरावत चालला असल्याची खंत पाहुण्यांनी बोलून दाखविली. 18 ते 21 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये परिसरातील बत्तीस संघांनी सहबाग घेतला आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 25 हजार, द्वितीय 15 हजार रुपयये व चषक आहे. ही बक्षीसे श्रीराम बिल्डर्स अॅण्ड डेव्हल्पर्स व इंजिनिअर गोविंद रामचंद्र टक्केकर यांनी पुरस्कृत केली असल्याचे स्पोर्ट्स कमिटीने सांगितले.









