वृत्तसंस्था/पुणे
पाटणा पायरेट्सने तेलुगू टायटन्सवर 41-37 अशा गुणांनी रोमांचक विजय मिळवित प्रो कब•ाr लीगच्या प्लेऑफमधील स्थान निश्चित केले. देवांकने 10 हा अंकित व दीपक यांनी हाय फाईव्ह गुण मिळवित या अटीतटीच्या सामन्यात आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या पराभवामुळे प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्यासाठी तेलुगू टायटन्सला आता इतर निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे. या सामन्यात रोमांचक सुरुवात करताना देवांकने पहिले चार गुण मिळवून दिले. त्यात दोन रेड गुणांचा समावेश आहे. पवन सेहरावतने त्याच्या तोडीस तोड खेळ करीत तेलुगू टायटन्सला 6-6 असे त्यांच्याबरोबरीत ठेवले.
पवस सेहरावतने कारकिर्दीतील आणखी एक माईलस्टोन गाठताना पीकेएलमध्ये 1300 रेड गुण नोंदवले. अंकितने त्याला सुपरटॅकल करीत आणि सुधाकर एमने केलेल्या रेडमुळे पाटणा पायरेट्सला आघाडी मिळाली. पण तेलुगू टायटन्सने त्यांना पुन्हा एकदा बरोबरीत गाठले. 10-10 असा स्कोअर असताना तेलुगू टायटन्सने पाटणाला ऑलआऊट केले. अजित पवारने दीपकला टॅकल केल्यानंतर टायटन्सला प्रथमच आघाडी मिळाली. पण ही आघाडी फार वेळ टिकली नाही. देवांक व आयान यांनी पाटणाला पुन्हा बढत मिळवून दिली. पहिल्या 20 मिनिटात दोन्ही संघांकडून तोडीस तोड खेळ झाला. देवांकने आपला फॉर्म कायम राखत पूर्वार्धात पायरेट्सला 19-18 अशी केवळ एका गुणाची आघाडी मिळवून दिली.









