बीड जिल्ह्यातील ओवी ज्ञानेशाची मंडळाचे आयोजन
ओटवणे प्रतिनिधी
राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धेत निवृत्त प्राथमिक मुख्याध्यापक तथा आंबेगाव येथील श्री क्षेत्रपाल देवस्थान समितीचे सचिव प्रकाश शंभा केळुसकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल प्रकाश केळुस्कर यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.बीड जिल्ह्यातील खिळद गावातील ओवी ज्ञानेशाची मंडळ यांच्यावतीने ओवी ज्ञानेशाची या स्पर्धेचे गेल्या ३ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात करण्यात आले होते. ओवी ज्ञानेशाची मंडळाच्या वतीने दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या स्पर्धेत राज्यभरातील ६७ जणानी सहभाग घेतला होता.
बीड जिल्ह्यातील खिळद येडेश्वरी मंदिरात झालेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात व्यासपीठावर ह.भ.प. गुरुवर्य श्री सुदर्शन महाराज सांगवीकर, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अँड आर डी येवले, प्रा. हरिश्चंद्र बोडखे, आयोजक पांडुरंग गर्जे, अँड. बाळासाहेब बोडखे, खिळदचे सरपंच डॉ. श्रीराम गर्जे, महंत काशिनाथ महाराज शास्त्री, मुख्याध्यापक चंद्रकांत लोखंडे गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रकाश केळुसकर यांना प्रशस्तीपत्र, ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि रोख रक्कम ५००० रुपये देऊन सत्कार करण्यात आला. गेल्या वर्षी या स्पर्धेत प्रकाश केळुसकर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला होता.









