कोल्हापूर :
घरफोड्या करणाऱ्या एका आंतरराज्य गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. अस्लम मेहबुब सनदी (वय 33, रा. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागे, अथणी, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून शहापूर (ता. हातकणंगले) पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या एका घरफोडीच्या गुन्हा उघडकीस आणून, घरफोडीत चोरले 4 लाख 16 हजार 500 ऊपये किंमतीचे 59.500 ग्रॅम सोन्याचे दागिणे जप्त केले. ही कामगिरी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेच्या पोलिसांनी केली, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी दिली.
पोलीस निरीक्षक कळमकर म्हणाले, स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांच्याकडून घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या तपास केला जात आहे. याचदरम्यान पोलीस अंमलदार महेश खोत यांना कर्नाटक राज्यातील पोलीस रेकॉर्डवरील एक अट्टल घरफोड्या चोरीचे दागिणे विक्री करण्यासाठी पुणे–बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरील टोप (ता. हातकणंगले) गावाच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाली. त्यावऊन त्या हॉटेलच्या परिसरात सापळा लावून, अस्लम सनदी (रा. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागे, अथणी, जि. बेळगाव) याला रंगेहाथ पकडले. त्याची अंग झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे 4 लाख 16 हजार 500 ऊपये किंमतीचे 59.500 ग्रॅम सोन्याचे दागिणे मिळून आले. या दागिण्याबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने इचलकरंजी शहराजवळच्या शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या घरफोडी मधील असल्याची माहिती दिली. त्यावऊन त्याच्याकडील चोरीचे सर्व सोने जप्त करीत अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी सुऊ केली. चौकशीमध्ये तो घरफोड्या करणारा आंतरराज्य पोलीस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. पुढील तपासासाठी त्याला त्याच्याकडून जप्त केलेल्या सोन्याच्या दागिण्यासह शहापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलत्पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.
त्याच्याविरोधी 29 घरफोडीचे गुन्हे
पोलिसांनी अटक केलेला अस्लम सनदी (रा. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागे, अथणी, जि. बेळगाव) याच्याविरोधी महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर सांगली जिह्यातील विविध पोलीस ठाण्यात 11 तर कर्नाटक राज्यातील विविध पोलीस ठाण्यात 18 असे 29 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तो काही महिन्यापूर्वी कारागृहाची हवा खावून कारागृहातून बाहेर आला. त्याने केलेल्या घरफोडी मधील बहुतांश गुन्हे सध्या न्यायप्रविष्ठ आहेत.








